Posts

Showing posts from November, 2020

बेसन लाडू

Image
बेसन लाडू!!!!सिर्फ नाम ही काफी है!!! असे म्हणावेसे वाटते. दिवाळी आणि त्यातील फराळाचे पदार्थ ही एक अनोखी मेजवानीच आहे. प्रत्येक पदार्थाचे वेगळे महत्व आणि वेगळी चव,लगेच तोंडात रेंगाळत रहाते. डायट, फॅट्स असे सगळे शब्द विसरायला होतात. त्यातल्या त्यात सगळ्यात करायला सोपे वाटणारे लाडू कोणते तर बेसन लाडू.  साधी रेसिपी अगदी, वाटीभर बेसन घ्यावे, गॅस वर जाड बुडाच्या भांड्यात दीड वाटी तुपात मंद आचेवर भाजावे, तांबूस रंग येई पर्यंत, मग थोडे दूध शिंपडावे आणि ढवळत राहावे. पीठ चांगले फुलून आले आणि मोकळं झाले की गॅस वरून उतरावे. थोडे थंड झाले की त्यात वाटीस पाऊण वाटी पिठिसाखर घालावी,  वेलची पूड, बदाम तुकडे केलेले, पिस्ता, जायफळ घालावे आणि छान गोल लाडू वळावे.  ही रेेेसीपी ह्या पुुुस्तकातील आहे. 1930 सालचे हे पुुुस्तक गेेली अनेक वर्षे माझ्याकडे आहे.  अर्थात त्यात त्यांनी मापे अच्छेर, शेर अशी वापरली आहेत आणि गॅसच्या ऐवजी चूल,पण मी थोडा बदल केला आहे आणि दिली आहे. वाचताना साधी रेसिपी वाटली तरी चुकाही खूप होऊ शकतात, त्या जो कोणी ब्लॉग वाचेल त्याने शेयर कराव्यात. खरंच हा पदार्थ ...

Unpolished Pulses

Image
सर्वसाधारण पणे मधुमेही व्यक्तीला सल्ले देणारे खूप. त्यातूनही अनेक प्रोग्रॅम आजकाल चालू आहेत जे मधुमेह रिव्हर्सल करून देऊ म्हणून सांगतात. काय खावे ह्यापेक्षा काय खाऊ नये ह्याचीच अधिक मोठी लिस्ट असते.  प्रत्येक तज्ञांचे मत वेगळे, लिस्ट वेगळी. मध्यंतरी सोशल मीडियावर पण दीक्षित vs दिवेकर अशा अनेक पोस्ट येत होत्या.  ह्या सगळ्यामध्ये विषय हा आहे की खरंच काय खावे, कधी खावे, किती खावे. वैद्य वैशंपायन ह्यांनी अतिशय उत्तम मार्ग सांगितला ह्या सगळ्यासाठी, अर्थात आयुर्वेद शास्त्रानुसार त्यांनी वात, कफ, पित्त प्रवृत्ती नुसार वेगवेगळे शास्त्र आहे हे सांगितले.  सर्वसाधारणपणे नैसर्गिक रित्या पिकवलेले म्हणजेच कमी रासायनिक प्रक्रिया असे धान्य खा, दिवसातून 2 वेळा जेवा, भरपूर व्यायाम करा. नैसर्गिक रित्या पिकवलेल्या डाळींचे फायद्यांबद्दल त्यांनी दिलेले काही मुद्दे, 1. सर्व डाळी ह्या भरपूर प्रथिन युक्त अशा असतात 2. डाळींच्या सालींमध्ये  खरंतर उत्तम असे पचण्यास आवश्यक असे गुणधर्म असतात पण अधिक चमकदार करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यातील हे गुण नष्ट होतात म्हणूनच ह्या डाळी पचण्यास ह...