बेसन लाडू
बेसन लाडू!!!!सिर्फ नाम ही काफी है!!!
असे म्हणावेसे वाटते. दिवाळी आणि त्यातील फराळाचे पदार्थ ही एक अनोखी मेजवानीच आहे. प्रत्येक पदार्थाचे वेगळे महत्व आणि वेगळी चव,लगेच तोंडात रेंगाळत रहाते.
डायट, फॅट्स असे सगळे शब्द विसरायला होतात.
त्यातल्या त्यात सगळ्यात करायला सोपे वाटणारे लाडू कोणते तर बेसन लाडू.
साधी रेसिपी अगदी, वाटीभर बेसन घ्यावे, गॅस वर जाड बुडाच्या भांड्यात दीड वाटी तुपात मंद आचेवर भाजावे, तांबूस रंग येई पर्यंत, मग थोडे दूध शिंपडावे आणि ढवळत राहावे. पीठ चांगले फुलून आले आणि मोकळं झाले की गॅस वरून उतरावे. थोडे थंड झाले की त्यात वाटीस पाऊण वाटी पिठिसाखर घालावी, वेलची पूड, बदाम तुकडे केलेले, पिस्ता, जायफळ घालावे आणि छान गोल लाडू वळावे.
अर्थात त्यात त्यांनी मापे अच्छेर, शेर अशी वापरली आहेत आणि गॅसच्या ऐवजी चूल,पण मी थोडा बदल केला आहे आणि दिली आहे.
वाचताना साधी रेसिपी वाटली तरी चुकाही खूप होऊ शकतात, त्या जो कोणी ब्लॉग वाचेल त्याने शेयर कराव्यात.
खरंच हा पदार्थ करायला सोपा, खायला छान पण healthy आहे का? असा प्रश्न अनेकांना पडत असेल.
साखर असल्यामुळे असे वाटते की नको खायला, रंग पहिला की पटकन हात लाडवाकडे जातो.
बेसन हे प्रामुख्याने भरपूर प्रोटीनयुक्त आहे. एक लाडू 300 कॅलरीचा असतो त्यात कार्बोहायड्रेट 150 कॅलरी, प्रोटीन 30 कॅलरी, फॅट्स 120 कॅलरी. सर्वसाधारण जेवणात 2000 कॅलरी असाव्यात तर त्यातील 15% कॅलरी ह्या एका लाडवात असतात.
खावा की न खावा? To eat or not to eat?
जरूर खा, खुप healthy नाही पण एक लाडू निश्चित चालेल.
त्यातून आपण डाळ जर रसायन विरहित वापरली तर अजून उत्तम. ड्रायफ्रूटस सुद्धा नैसर्गिक रित्या तयार केलेले असतील तर अजून उत्तम. गाईचे तूप असेल तर सोन्याहून पिवळे, आणि लाडवाला रंग ही मस्त येईल. तोंडात टाकल्या टाकल्या विरघळला तर तो लाडू मस्त.
साखरेला पर्याय काय??
अनिता घाटणेकर
विशुद्धम
9881714890
Comments
Post a Comment