Posts

विशुद्धम

सैन्द्रिय शेती ३

Image
मशागत मातीची, सैन्द्रीय शेती किंवा नैसर्गिक शेती म्हणजे काय आणि त्यासाठी वापरले जाणारे अनेक प्रकारच्या निविष्ठा असे मागच्या दोन्ही भागात लिहिले होते. ह्या सर्व प्रक्रियेमध्ये गाईचे शेण , गोमुत्र ह्याला अनन्य साधारण महत्व आहे तसेच ताक, मिरची आणि काही शेतात उगवणाऱ्या वनस्पती जसे टणटणो , निगुर्डीचा पाला वगैरे. अजून एका गोष्टीचे म्हणजे आच्छादन ह्यालाही महत्व आहे. १९६०-६५ च्या  दरम्यान शेती मधील उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने अनेक रसायनांचा आणि खतांचा वापर व्हायला  सुरवात झाली. उतप्न्न वाढले परंतु मातीचा पोत बिघडत गेला. जमीन  म्हणजे माती आणि पाणी हे दोन मुख्य घटक शेतीचे परन्तु अति रसायनांचा परिणाम मातीवर आणि औद्योगिक विकासामुळे पाण्यावर दिसू लागला. निकृष्ट जमीन आणि पाणी ह्यामुळे मिळणारे उतप्न्नहि निकृष्ट दर्जाचेच होऊ  लागले. ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या शरीरावर हि दिसून येत आहे. त्या बद्दल पुढे कधीतरी. जमीन हे सर्वात महत्वाचे, मातीचा पोत उत्तम राखण्यासाठी अनेक पर्याय सैन्द्रीय शेतीमुळे वापरले जात आहेत. भारतीय परंपरे मध्ये गाईचे महत्व खूप आहे. आपण तिला गोमाताचा म्हणतो म्हणजे गाय दिसली कि आपले

सैन्द्रीय शेती - २

सैन्द्रीय शेती आणि निविष्ठा  मागच्या लेखात सैन्द्रीय शेती म्हणजे काय हे पाहिले . ह्या लेखात सैन्द्रीय पद्धतीची शेती करताना कोणते घटक वापरले जातात , तसेच सैन्द्रिय निविष्ठा पद्धती काय आहेत ? जीवाणूंचे परिणाम वाढवण्यासाठी रायझोबियम , ॲ झेटोबॅक्टर , ॲ झोस्पिरिलियम , ॲ सेटोबॅक्टर , स्फुरद विरघळवणारे जिवाणू ( पीएसबी ) या जिवाणू खतांचा वापर केला जातो . ह्याचा परिणाम असा कि उत्पादनात ८ ते १० टक्के वाढ होते . साधारण पणे सतत ऐकवत असलेले काही निविष्टांची नवे जसे , बीजामृत , जीवामृत , अमृतपाणी . दशपर्णी अर्क , संजीवनी . ह्याची प्रक्रिया काय आहेत हे इथे द्यायचा प्रयत्न आहे .   ह्या सर्व निविष्ठा निर्मिती प्रमाणित अशी नाही . परंतु शेतकऱ्यांचा अनुभव हाच ह्यात मुख्य घटक आहे . मी ह्यातील तज्ञ नाही त्यामुळे मी हि काही पुस्तकांमधून आणि शेतकऱ्यांच्या भेटी मधून केलेल्या  अ भ्यासातून हे लिहिले आहे . बीजामृत मध्ये गाईचे शेण , गोमुत्र , दूष , चुना , पोयटा माती , ट्रायकोडर्मा व्हिरिडी , पाणी ह्याचा वापर करतात . १२