सैन्द्रीय शेती - २

सैन्द्रीय शेती आणि निविष्ठा 

मागच्या लेखात सैन्द्रीय शेती म्हणजे काय हे पाहिले. ह्या लेखात सैन्द्रीय पद्धतीची शेती करताना कोणते घटक वापरले जातात, तसेच सैन्द्रिय निविष्ठा पद्धती काय आहेत?

जीवाणूंचे परिणाम वाढवण्यासाठी रायझोबियम, झेटोबॅक्टर, झोस्पिरिलियम, सेटोबॅक्टर, स्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) या जिवाणू खतांचा वापर केला जातो. ह्याचा परिणाम असा कि उत्पादनात ते १० टक्के वाढ होते.

साधारण पणे सतत ऐकवत असलेले काही निविष्टांची नवे जसे, बीजामृत, जीवामृत, अमृतपाणी. दशपर्णी अर्क, संजीवनी. ह्याची प्रक्रिया काय आहेत हे इथे द्यायचा प्रयत्न आहे.  ह्या सर्व निविष्ठा निर्मिती प्रमाणित अशी नाही. परंतु शेतकऱ्यांचा अनुभव हाच ह्यात मुख्य घटक आहे.

मी ह्यातील तज्ञ नाही त्यामुळे मी हि काही पुस्तकांमधून आणि शेतकऱ्यांच्या भेटी मधून केलेल्या अभ्यासातून हे लिहिले आहे.

बीजामृत मध्ये गाईचे शेण, गोमुत्र, दूष, चुना, पोयटा माती, ट्रायकोडर्मा व्हिरिडी, पाणी ह्याचा वापर करतात. १२ तास भिजवून दुसर्या दिवशी बीजप्रक्रियेसाठी वापरले जाते.

जीवामृतासाठी शेण, गोमुत्र, गुळ, बेसन पीठ, वनातील माती, पाणी ह्याचा वापर होतो. ह्याला ते दिवस दिवसातून वेळा ढवळून ठेवावे लागते आणि मग वापर करता येतो.

अमृतपाणी ह्यामध्ये शेण, गाईचे तूप, गुल, पाणी ह्याचा समावेश असतो. ह्याचे पिकांना घालण्याचे प्रमाण आणि दिवस ठरलेले असतात साधारण ३० दिवसाच्या अंतराने पाण्यातून देतात, आणि महिन्याने झाडांच्या ओळीत पाण्यातून सोडता येते.

दशपर्णी अर्क ह्यात अनेक वनस्पतींचा काढा जसे कडुलिंब, बेशरमी, टणटणी, रुई, झेंडू, करंज, गुळवेल, धोतर, सीताफळ, निगुर्डी असते , हिरवी मिरची ठेचा, लसून, शेण, गोमुत्र, पाणी असे घटक असतात. दिवसातून वेळा ढवळून, महिना ठेवल्यावर मिश्रण शेतीमध्ये वापरतात. विविध किडी, रोगांच्या प्रतिबंधासाठी ह्याचा वापर होतो.


संजीवक मध्ये शेण,गोमुत्र, गुल,पाणी ह्याचा वापर होतो. ह्यालापण १० दिवस ठेवून नंतर पाण्यात मिश्रण करून वापरात आणण्यात येते.


पंचगव्य करताना शेणखत, गोमुत्र दही, दूध, नारळाचे पाणी, गुळ, केळी, पाणी ह्याचा वापर करण्यात येतो. ह्यालाही दिवसाची प्रक्रिया आहे. पाण्य्मधून शेतीला देता येत.

हे सर्व वाचत असताना आणि ऐकत असताना एक लक्षात येत गेले शेतकरी काही वाया घालवत नाही. घरातील गायी पासून मिळणारे शेण, गोमुत्र, दही, दूध, मिरची, लसूण, पाला पाचोळा असे सर्व वापरात येते.  

नैसर्गिक शेतीचा हाच मुख्य फायदा आहे कि ह्या मध्ये कोणतेही रसायन मिसळले जात नाही जे काही आहे ते शेतातील, शेतात.

जमिनीतून जमिनीत मिसळले जाते

पुढील लेखात ह्याचे पिकांना होणारे फायदे पाहू यात. 

Comments

Popular posts from this blog

बोलका व्यवसाय : नवे कुटुंब, नवी नाती-गोती

खपली गहू [ Emmer wheat - Read English information after Marathi ]