खपली गहू [ Emmer wheat - Read English information after Marathi ]

 EARTH'S BUFFET...!!!


खपली गहू [ Emmer wheat - Read English information after Marathi ]


*प्राचीन आणि वैशिष्टपूर्ण जात असून प्राचीन सभ्यतेच्या आठवणी असलेला हा गहू आहे॰

मध्य  पूर्व [इजिप्त,तर्की,इराण] या ठिकाणच्या उत्खनन्नात [इसपुर्व ९५००काळात] खपली गहू इतिहास दिसून येतो. दक्षिण आशिया भागातील इंडस व्हॅली मध्ये [इसपूर्व-७०००ते ५०००]या वेळेत पोहचला असण्याचा इतिहास आहे. भारतामध्ये खपली गहू हा कश्मीर मध्ये मध्यपुर्व पर्शिया ,अफगाणिस्तान येथून आणि दक्षिण भारतात उत्तरपुर्व आफ्रिका मधून आले असण्याचे अनुमान आहे. 


*शेतातून काढणी केल्यानंतर टणक अशा टरफलात असणारा हा गहू असून एका तुसात २ दाणे असतात.बियाण म्हणूनही तो टरफलासाहित वापरला जातो.


*तांबड्या रंगाचा व लांबसडक असलेला हा गहू  उपयोग आणणाच्या अगोदर गिरणीत नेवून भरडावा लागतो. 


*आंध्रप्रदेश,कर्नाटक ,तमिळनाडू, महाराष्ट्र या राज्यातील काही भागात हा गहू पिकवितात.


*जोडगहू, पोपटीया -गुजराती,सांबा -कर्नाटक या नावाने ही खपली गहू ओळखला जातो.


*पौष्टिकता [ /१००ग्रॅम ]


प्रथिने                                  १८ग्रॅम


स्टार्च                                 ४२.७ग्रॅम


तंतु                                          ९.२ग्रॅम


मेद                                         १.०२ग्रॅम


क्षाऱ- लोह                                ३४.१मिलीग्राम


क्षार- मेगनेशीअम                 १०९०मिली ग्राम


क्षार- झिंक                                 २२.८मिली ग्राम


अॅंटीआक्सिडेंट                         २५७.७मिलीग्राम


एसेनश्यल अमिनो असिड- लायसिन,थेओनिन,आयसोलूसीन,व्हालीन,फीनाईअलानिन,मेथोनीन


जीवनसत्वं-ब १,२,३,६,९ 


आरोग्यासाठी उपयुक्तता:


*खपली गहूची शरीरासाठी पौष्टिकता ही त्यामधील असणारे आहारतंतू ,अटीटीआक्सिडेंट गुणधर्म, प्रथिने पचनशीलपणा,चांगल्या प्रकारचे स्टार्च यामुळे आहे.


*खाल्यानंतर हळू रक्तात साखर सोडणाच्या गुणधर्मामुळे आणि पोट पूर्ण भरले अशी भावना पटकन खाल्यानंतर येत असल्यामुळे मधुमेह आणि वजन कमी करणाच्या आहारात खपली गहू उपयुक्त आहे.


*क्षारयुक्त असल्यामुळे शरीर वाढीसाठी उपयोगी खपली गहू आहे. मेग्निशिअम आणि झिंक भरपूर प्रमाणात असल्यामुळे प्रतिकार शक्ति वाढविणे आणि हाडे मजबूत राहणे यासाठी खपली गहू खूप उपयुक्त आहे.


*तंतूचे प्रमाण भरपूर असल्यामुळे रक्तातील घटक मेद कमी करून हृदयरोग, उच्यरक्तदाब यासाठी खपली गहू उपयोगी आहे.


*प्रथिने ही इतर प्रकार गहू पेक्षा जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीराची वाढ आणि कार्य नीट ठेवण्यासाठी मदत होते. या गहूमध्ये असलेले एसेनश्यल अमिनो अॅसिड आपले आरोग्य हे उत्तम ठेवत असते.


*खपली गहू मध्ये असणारे अॅंटीआक्सिडेंट हे हृदयरोग, कर्करोग,मधुमेह, मेंदूचे काही आजार यापासून संरक्षण करीत असते.


*ग्लुटेन हे खपली गहू मध्ये खूप कमी प्रमाणात असल्यामुळे आलेर्जीक आजारांमध्ये उपयोगी.


*खपली गहुत असलेले करोटोनोइड लुटीन हे डोळ्यांचे आरोग्यासाठी उत्तम आणि कर्करोग न होण्यासाठी ही उपयुक्त असते.


*खपली गहुमध्ये असणारे जीवनसत्व शरीरातील चयापचयाच्या क्रिया तसेच शरीर कार्यासाठी उपयुक्त आहे.


@पौष्टिकता,एक वेगळी चव आणि किडरोग यापासून प्रतिकार क्षमतेमुळे खपली गहू हे एक पारंपरिक नैसर्गिक अन्न टिकाऊ शेतीसाठी आणि आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे

.

*पारंपरिक खाद्यपदार्थ - मांडे,पूरणपोळी,घेवर,बाटी,मालपुआ, चुरमा,शेवई मठरी इ. उल्लेख संस्कृत अभ्यासात दिसतो.


ENGLISH:

EMMER WHEAT 


History:

 

Emmer wheat found in Middle Eastern sites from 9500BCE. Emmer spread across the ancient world ,reaching the Indus Valley around 7000-5000BCE.

It is speculated that Emmer wheat came to kashmir from Middle East through Persia and Afaganisthan  in South India from North Eastern Africa. 


*It is husked wheat with 2 seeds inside the husk.


*The variety is known for it's drought and pestidiseases resilience and need less irrigation.


*NUTRITIONAL VALUES:[ /100gm]

Protein                                  18gm


Starch                               47.7gm


Total dietary fibers             9.2gm


Lipid                                 1.02gm


Mineral- Iron                     34.01mg


Mineral-Mg                        1090mg


Mineral-Zn                         22.8mg


Amino acids- Lysine, Threonine,Isoleucine,Valin,phynylalanin

Methoinine,Leucin


Vitamins B1,B2,B3,B6,B9

 

antioxidant 257.6mg


[reference USDA 2016]


HEALTH BENEFITS:


* The higher nutritional value of emmer wheat is attributed to higher fiber, antioxidant compound concentration, high protein digestibility, high resistance starch content and slower carbohydrates. 


*The low glycaemic index value and high satiety value of emmer wheat make it particularly suitable for special diet e.g. diabetes and weight reduction.


*Because of its richness in minerals like Magnesium and zinc, useful for increase immunity and bone health.


*Protein provides an adequate amount of essential amino acids important for human health.


*Because of it's good dietary fiber content, useful in heart disease, diabetes, stroke and some type of cancers.


*Emmer wheat is low gluten variety, therefore useful in some allergic conditions.


*Antioxidant plays role in protecting against heart disease, diabetes, stroke, cancers.


 @ Due to the nutritional value, special taste of it's products and it's character of resistance to pest and disease Emmer wheat in recent years move toward as natural ancient food and sustainable agriculture.

Comments

Popular posts from this blog

बोलका व्यवसाय : नवे कुटुंब, नवी नाती-गोती

सैन्द्रीय शेती - २