Unpolished Pulses
सर्वसाधारण पणे मधुमेही व्यक्तीला सल्ले देणारे खूप. त्यातूनही अनेक प्रोग्रॅम आजकाल चालू आहेत जे मधुमेह रिव्हर्सल करून देऊ म्हणून सांगतात. काय खावे ह्यापेक्षा काय खाऊ नये ह्याचीच अधिक मोठी लिस्ट असते.
प्रत्येक तज्ञांचे मत वेगळे, लिस्ट वेगळी. मध्यंतरी सोशल मीडियावर पण दीक्षित vs दिवेकर अशा अनेक पोस्ट येत होत्या.
ह्या सगळ्यामध्ये विषय हा आहे की खरंच काय खावे, कधी खावे, किती खावे.
वैद्य वैशंपायन ह्यांनी अतिशय उत्तम मार्ग सांगितला ह्या सगळ्यासाठी, अर्थात आयुर्वेद शास्त्रानुसार त्यांनी वात, कफ, पित्त प्रवृत्ती नुसार वेगवेगळे शास्त्र आहे हे सांगितले.
सर्वसाधारणपणे नैसर्गिक रित्या पिकवलेले म्हणजेच कमी रासायनिक प्रक्रिया असे धान्य खा, दिवसातून 2 वेळा जेवा, भरपूर व्यायाम करा.
नैसर्गिक रित्या पिकवलेल्या डाळींचे फायद्यांबद्दल त्यांनी दिलेले काही मुद्दे,
1. सर्व डाळी ह्या भरपूर प्रथिन युक्त अशा असतात
2. डाळींच्या सालींमध्ये खरंतर उत्तम असे पचण्यास आवश्यक असे गुणधर्म असतात पण अधिक चमकदार करण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यातील हे गुण नष्ट होतात म्हणूनच ह्या डाळी पचण्यास हलके असतात
3. आपल्या प्रत्येकाला अतिमेदयुक्त असे खाण्याचे तोटे माहीत आहेत पण ह्या डाळींमध्ये मेदाचे प्रमाण कमी (less in fats)
4. ह्या डाळींमध्ये B-complex, calcium आणि potasim भरपूर प्रमाणात असते
5. शरीराला आवश्यक असे लाल रक्तपेशी निर्माण करण्यास उपयुक्त असे गुण असतात. ह्यामध्ये लोहाचे योग्य प्रमाण असल्याने लाल पेशींची निर्मिती योग्य होते
6. अशक्तपणा कमी करण्यास मदत करते, म्हणूनच आजारी पडले तर वरण-भात, मुगाची खिचडी खायला देतात
7. LDL Cholesterol चे प्रमाण योग्य ठेवून हृदयाला मजबूत ठेवते
8. शिजायला अतिशय कमी वेळ लागतो
त्यांचे मुद्दे वाचून आपण सर्वांनीच आपल्या जेवणात जरूर ह्या डाळींचा समावेश करावा. नैसर्गिक रित्या पिकवलेली डाळ कुठे मिळते , योग्य भावात मिळते आहे का? ते पाहून खरेदी करा आणि खायला लागा आणि खायला लावा.
डाळ पॉलिश किंवा प्रोसेस करताना अनेक वेळा अनेक उत्तम गुणधर्म कमी होतात. सध्याच्या काळात प्रतिकार शक्ती वाढवायची आहे, शारीरिक दृष्ट्या उत्तम राहायचे असेल तर ह्या पर्यायांचा विचार करावाच लागेल.
बैठे काम, घरातील सर्व लहान थोर सतत लॅपटॉप समोर असल्यामुळे अनेक व्याधींचा सामना करावा लागतो, पण आपण आपल्या आहारात थोडा बदल केला तर कदाचित आपल्या शारीरिक तंदुरुस्ती साठी उपयुक्त होऊ शकेल.
Be Healthy, Be rich in all vitamins.
अनिता घाटणेकर
9881714890
विशुद्धम
मॅडम, मुख्यत्वे माझ्या निरीक्षणा नुसार सर्वच घरात डाळींचा वापर दररोज केला जातो पण यांना फारच स्वच्छ केले जाते. आणि याबरोबरच पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे व फायबर धुवून जातात. त्यासाठी पॉलिश न केलेल्या डाळी खाणे आरोग्यास चांगले आहे.
ReplyDeleteतसेच डाळी कधीही प्रेशर कुकर मध्ये शिजवू नये. यामध्ये फक्त तीव्र दाबाने फक्त डाळी फोडल्या जातात. शिजवल्या जात नाहीत त्यासाठी मातीच्या भांड्यात शिजवाव्यात. चविष्ट पणा व टिकावूपणा वाढेल. प्रयत्न करा , बघा एकदा करून.
आपण सांगितल्याप्रमाणे पॉलिश न केलेल्या डाळीच खाणे आरोग्यास चांगले आहे. अतिशय साध्या सोप्या भाषेत त्याचे महत्त्व नमूद केले आहे.
ReplyDelete