जमीन - विशुद्ध - पुढची पिढी

नाव  - श्री गणेश जोशी

वय  - ३० वर्षे

शेती - ३ एकर 

नैसर्गिक शेती 

शिक्षण - MA Mass Communication 

पीक - कपाशी, तुरडाळ,भाज्या, मोसंबी, हरबरा, ज्वारी 

अगदी ३० वर्षाचे जोशी बोलताना खूप मोठा संदेश देऊन गेले. MA केले होते, पत्रकारितेची नोकरी सकाळ मध्ये करत होते, आणि काही कारणाने आचार्य विनोबा भावे ह्यांच्या आश्रमात राहण्याचा योग आला. कामानिमित्त होते पण राहणे झाले, वाचन झाले. 

सुरवातीचे विचार असे होते की शेती विकावी, औरंगाबाद मध्ये घर घ्यावे, गाडी घ्यावी, white color नोकरी करावी. पण आश्रमात जाऊन, राहून आल्यावर डोक्यात विचार घोळू लागले आणि मनात असे आले की आपण पुढच्या पिढीला फक्त भौतिक जगणे शिकवणार आहोत का, आपल्याकडे पिकणारे अन्न जर काळ्या माती ऐवजी त्या रसायनांच्या जमिनीतील असेल तर पुढची पिढी कशी घडवलं. जे आपण लहान पणापासून आई वडील ह्यांच्या कडून शिकलो आणि त्यातूनच आपले शिक्षण केले, उत्तम तब्येत राखली ते जर आपण पुढच्या पिढीला नाही देऊ शकलो तर काय उपयोग. 

श्री गणेश जोशी ह्यांनी स्वतःचे ते white color जे स्वप्न बाजूला ठेवले आणि नैसर्गिक शेती करण्याचा मार्गाला लागले.

2016 पासून पूर्ण वेळ शेती व्यवसायात काम सुरू केले. पोटापूरते कमवावे, छोटे घर, जे पिकते ते खायचे, आई वडील शेतावर, तिथेच स्वतःच्या 2 मुली, बायको आणि ते स्वतः राबतात. बायकोचे फॉर्मल शिक्षण 10वि पण शेती ह्याविषयात एकदम PhD. सगळी कष्टाची कामे स्वतः करणार, कोणते पीक घायचे, कधी घ्यायचे असे सगळे ज्ञान. कौतुक असे की दोन्ही मुली अगदी 10 आणि 6 वर्षाच्या पण शेतात काम करत असतात. मराठी मध्यम मध्ये शिकत आहेत. शाळेत मुलींचे नाव आईच्या नावाने जोडले आहे, सगळी कमाई बायकोकडे देऊन स्वतः भरपूर काम करणे असे अगदी मस्त आयुष्य. सध्याच्या ह्या ऑनलाइन शिक्षण काळात मुलींना स्वतः अभ्यास घेऊन शिकवत आहेत.

ह्यांना भेटल्यावर वाटले, आपण शहरात किती तडतड करत आहोत, सगळे विसरल्यासारखे पैसे हीच मुख्य गरज असल्यासारखे, अर्थात तेही गरजेचे आहे पण सावकाश जावे सगळ्यांना बरोबर घेऊन जावे. 

उत्तम शुद्ध खावे आणि स्वतःला तब्येतीत ठेवावे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

बोलका व्यवसाय : नवे कुटुंब, नवी नाती-गोती

सैन्द्रीय शेती - २

खपली गहू [ Emmer wheat - Read English information after Marathi ]