Strawberry
स्टाँबेरी हे ऐकल्यावरच महाबळेश्वर आणि तेथील जैव वैविध्यतेने नटलेले समृद्ध असे गाव डोळ्यासमोर येते. महाराष्ट्रातील तर प्रत्येक पर्यटक तिथे वर्षातून एकदा तरी भेट देत असतोच. नवीन लग्न झालेले जोडपं, मित्रांची एकत्र सहल, कुटुंबाबरोबर करायची ट्रिप असे सतत गर्दीने भरलेलं गाव.
त्याच्या टप्प्यातील जावळी खोरे, जवळचा प्रताप गड, जाताना लागणारे वाई, गणपतीचे स्थान आणि अनेक चित्रपट निर्मात्यांना भुरळ घालणारे स्थान. त्यातील एक म्हणजे भिलार. ह्या गावाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली गेल्या दशकामध्ये, " पुस्तकांचे गाव". सरकारने आणि अनेकांनी नावाजलेला प्रोजेक्ट. निवांत या, कोणते पुस्तक वाचायचे ते सांगा, त्या घरासमोर बसा आणि पुस्तक वाचुन परत द्या. अशा निसर्गरम्य ठिकाणी वाचन करणे आणि खाणे म्हणजे स्वर्गालाही लाजवेल असे सुख.
भिलार हे गाव जसे पुस्तकांसाठी तसेच तेथील स्टाँबेरी साठी देखील प्रसिद्ध आहे.
युरोप मधील 18 व्या दशकातील हे फळ, नॉर्थ अमेरिका आणि चाईल मधील 2 स्टाँबेरी पेशींचे संकरीत फळ.
महाबळेश्वर येथील वातावरण ह्या पिकास अतिशय पोषक असे आहे. Mother Plant हे बाहेरून येते किंवा आता आपल्या इथेही त्याची निर्मिती होते आणि अनेक शेतकरी कुटुंब त्याची लागवड करतात.
तसे म्हटले तर रसायनांचा वापर अनिवार्य असतो ह्या फळासाठी कारण खूप नाजूक असे फळ आहे. तरीही आता सैंद्रिय म्हणजेच जीवामृत आधारित शेती करणारे अनेक शेतकरी आहेत आणि ह्या फळातील नैसर्गिक गुण जपून त्याची शेती करत आहेत. फेब्रुवारी पासून एप्रिल पर्यत हंगाम असलेलं हे फळ अतिशय रसदार, लाल रंगाचे आणि चवीसही गोड असते.
मुख्य गुणधर्मे,
1. C Vitamins
2. Manganese
3. B9 Vitamins
4. Potassium
5. Anitioxident असल्यामुळे heart health उत्तम राहण्यासाठी तसेच Diabetic साठी उपयुक्त
शक्यतो ताजे फळ खावे, त्यामुळे मिळणारे फायदे अधिक.
स्टाँबेरी पासून अनेक जॅम, जेली, आईस्क्रिम असे पदार्थ बनवले जातात.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वतःच्या उत्तम प्रकृतीसाठी ज्या हंगामा मध्ये जे पिकते ते खावे. ताजे खावे आणि उत्तम राहावे.
Comments
Post a Comment