नवान्न पूर्णिमा
नवान्न पोर्णिमा
खरेतरं नावातच सारे काही आहे. कोजागिरी पोर्णिमा आणि त्याचा पुढचा दिवस. आश्विन महिन्यातील पोर्णिमेला कोजागिरी पोर्णिमा, शरद पोर्णिमा म्हणतात.
चंद्र मोठा दिसण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे त्या दिवशी चंद्र हा पृथ्वीच्या कक्षेच्या अधिक जवळ आलेला असतो. भारतीय परंपरेनुसार ह्याचे वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे महत्व आहे. कुठं करवाचौथ, कुठे कोजागिरी आणि कुठे अजून काही.
शहरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या दृष्टीने कोजागिरी पोर्णिमा म्हणजे मसाला दुध आणि एकत्र मित्र, मैत्रिणी किंवा नातेवाईक ह्यांनी मिळून केलेली मजा. सध्या सगळ्या बागा बंद आहेत नाहीतर सगळ्या बागा लोकांनी भरलेल्या आणि मसाला दुधाच्या दुकानापाशी गर्दी असे चित्र दिसले असते.
मध्यंतरी Whatsapp गुरुने सांगितले कि नवरात्र हे एकप्रकारे आपले soil tasting असते. कसे तर साधारण ह्या दिवसात जे नवरात्र करतात त्यांच्याकडे देवापुढे धान्य पेरून ठेवलेले असते आणि त्याचे पूजन होते. नवव्या दिवशी त्याला व्यवस्थित कोंब येऊन ते वाढलेले असते. आपली माती धान्य पिकवायला सजग झाली आहे. किंवा उत्तम धान्य येईल त्याची ती एक ग्वाही म्हणू हवे तर.
शहरापासून थोडे दूर गावात गेलो कि ह्या प्रत्येक ऋतूचे, सणांचे महत्व पटू लागते. शेतकऱ्यांच्या दृष्टीने ह्या दिवसाचे अतिशय महत्व आहे. ह्या दिवसातच नाचणी, भात, वारी हे नवीन आलेले असते. त्या धान्याची पूजा करून घरात त्या धान्याचा पदार्थ शिजवणे आणि त्याचा नेवैद्य दाखवणे. अशी ही नवान्न पोर्णिमा.
कोकणात भात मुबलक, आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दरम्यान नवीन भात आलेला असतो. भाताच्या लोंब्या, कुर्दूची फुले, झेंडूची फुले, नाचणी, वरी घ्यायला बाजारात गर्दी तर असतेच पण ह्या सगळ्याचा एकत्र हार करून , पूजा करून त्याचे दाराला तोरण लावायची पद्धत. त्याच दिवशी नवीन तांदुळाचा भात करून खायची पद्धत. तसेच तांदुळाची खीर खायची देखील.
भारतीय सणांचे महत्व जेव्हा ह्या क्षेत्रात काम करायला सुरवात केली तेव्हा अधिक उत्तम पद्धतीने कळू लागले.
विशुद्धम
Soil to Soul
अनिता घाटणेकर


Comments
Post a Comment