सैन्द्रीय शेती
सेंद्रिय शेती
मागील पूर्ण वर्ष हे आपण काहीतरी स्वतःचे काम सुरु करायचे असे चालू होते मित्राशी बोलताना असे जाणवले खूप IT वगैरे केले तरी आपण आता वेगळा विषय करून म्हणजे खरेदी विक्री सेवा, किंवा सेवा क्षेत्र असे काहीतरी करावे. भावाने सैंद्रीयचा पर्याय समोर ठेवला.
सेंद्रिय शेती म्हणजे काय? हेच जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या रोजच्या जेवणात सर्वसाधारण भारतात कोठेही गेलो तरी प्रोटीन, carbohydrate आणि इतर प्रथिनांचे प्रमाण असते. त्यातून महाराष्ट्रातील जेवण पहिले तर, पोळी, भाजी, कोशिंबीर, १ वाटी डाळ, १ वाटी भाजी, चटणी, लिंबू असे असते.
सध्याचे बदलत्या शेती पद्धतीमुळे ह्यातील योग्य प्रथिनांचे प्रमाण कमी झाले आहे, असे आपण म्हणत आहोत. त्याचा सगळ्याचा आपल्या जीवन पद्धतीवर होत असतो. अनेक प्रकारचे आजार, सूक्ष्म आजार, होत असतात. त्याला उपाय म्हणजे नैसर्गिक पद्धतीने शेती करणे.
सेंद्रिय शेती करणारे सध्या शेतकरीही दिसत आहेत. अशा काही अनेक शेतकर्यांना गेल्या ५ ते ६ महिन्यात भेटणे झाले. त्यांनी सेंद्रिय शेती म्हणजे काय? कशाप्रकारे केली जाते? कोणत्या तत्वावर केली जाते? असे सगळे मांडले. तेच इथे लिहायचा प्रयत्न.
सर्वसाधारण पणे सृष्टी पाच तत्वांवर आधारित आहे, जसे भूमी, जल, आकाश, हवा आणि अग्नी असे. ह्या तत्त्वांनुसार शेती उद्योग चालतो. पण ह्या तत्वाच्या विरोधात जाऊन आपण भूमी, पाणी , हवा, आकाश , अग्नी असे सगळेच प्रदूषित करत आहोत. त्याचा आपल्या जीवनमानावर परिणाम होत आहे.
सैंद्रिय शेतीही पिकांचे अवशेष, सैन्द्रीय पदार्थ, जीवाणू यांचा वापर करता येतो. कडी कचरा, धसकटे, तण, जनावरांचे मलमूत्र,अवशेष अथवा शेताबाहेर कुजवून सैन्द्रीय खतांची निर्मित्ती करता येते.
अधिक पिक घेण्याच्या हव्यासापोटी, वर्षानुवर्षे एकच पिक एकाच भागात घेतले जाते. त्यामुळे सैन्द्रीय कर्बाचे प्रमाण हीच मुल समस्या आहे.
ह्याला उपाय काय? तर आम्ही भेट दिलेल्या अनेक शेतकर्यांनी सांगितले की आच्छादन म्हणजे पिकांचे उर्वरित भाग तिथेच गाडून टाकून सैन्द्रीय कर्बाचा पुरवठा संतुलित करणे हा एक उपाय आहे. तसेच व्यवस्थापन पद्धतीने आंतरपिके, पिकांचे फेरपालट, हिरवळीची खते अशा सुद्धा गोष्टींचा उपयोग करता येतो. नत्राच्या स्थिरीकरण्यासाठी शेतात तग, धैंचा यांसारख्या हिरवळीच्या पिकांच्ची पेरणी करून जमिनीत गाडली जातात. डाळवर्गीय पिंकामुळे जमिनीत नत्रांचे प्रमाण स्थिर करण्यास मदत करतात. पिक पद्धतीने फेरपालटासाठी करता येऊ शकतो.
तसेच नत्र स्थिरीकरणासाठी विविध जैविक घटकांची बीजप्रक्रिया, आळवणीद्वारे वापर केला जातो. सात फवारणी होत असल्यामुळे किडी-रोग प्रतिकारक्षम झाले आहेत. नवीन रोग, नवीन कीड ह्यांचा प्रादुर्भाव होताना दिसतो. ह्या प्रकारच्या शेती मध्ये कीड नियंत्रणासाठी एकात्मिक सैन्द्रिय, वनस्पतीजन्य, जैविक घटकांचा वापर केला जातो. अन्नपदार्थ व्यवस्थापन,सैन्द्रीय शेतीसाठी शेणखत, कंपोस्ट खात, कोंबडी खात, हिरवळीचे खात आणि गांडूळ खत याचा वापर केला जातो.
माहिती साठीची पुस्तकांची नवे आणि इतर साहित्य पुढील भागात लिहिते.

Comments
Post a Comment